गुड मुस्लीम बॅड मुस्लीम | Good Muslim Bad Muslim

भाषा : मराठी
लेखक : महमूद ममदानी ( Mahamud Mamdani )
अनुवाद : पुष्पा भावे ( Pushpa Bhave )
मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerakar )
पृष्ठे :  ३१२
वजन :  ५०० ग्रॅम

‘चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युध्दा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद.

340.00 299.00

Quantity

Description

महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह  संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे.
जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक…
‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!’

Additional information

Weight 500 g
pages

312

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गुड मुस्लीम बॅड मुस्लीम | Good Muslim Bad Muslim”