माझी आई | Majhi Aai

भाषा : मराठी
लेखक :
पृष्ठे :
वजन :   ग्रॅम

मदर्स डे चे औचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे. या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, व्यंगचित्रकार श्री. शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणक्षेत्रातील श्री. रमेश पानसे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या विषयावर अतिशय सुंदर असे लेख लिहिले आहेत. डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे.
पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ, त्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदान, तिचे आणि त्यांचे नाते, यांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेल. थोडक्यात, माझी आई हे पुस्तक मदर्स डे च्या निमित्ताने अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल.

150.00

Quantity

Description

यामध्ये खालील मान्यवरांचे लेख असणार आहेत –
१) डॉ. जयंत नारळीकर
२) डॉ. प्रकाश बाबा आमटे
३) श्री. सचिन तेंडुलकर
४) श्री. शि. द. फडणीस
५) डॉ. यशवंत मनोहर
६) श्री. इंद्रजित भालेराव
७) श्री. उत्तम कांबळे
८) कल्पना दुधाळ
९) श्री. मिलिंद जोशी
१०) श्री. सय्यद भाई
११) डॉ. रमेश पानसे
१२) श्री. विष्णू मनोहर
१३) श्रीमती सुचेता भिडे – चापेकर
१४) श्री. महेश काळे
१५) ममता सपकाळ
१६) सखी गोखले
१७) यशोदा वाकणकर
१८) आर्या आंबेकर
१९) वीणा पाटील
20) डॉ. हमीद दाभोळकर
21) सोनाली कुलकर्णी

Additional information

pages

160

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझी आई | Majhi Aai”