रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा | Raw Bharatiy Guptcharsansthechi Gudhgatha

भाषा : मराठी
लेखक : रवी आमले ( Ravi Aamale )
पृष्ठे : २९३
वजन : ३४३ ग्रॅम

299.00

Quantity

Description

ही आहे रॉची कहाणी.

बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची… शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची… रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची.

पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरून चालत असते ते. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तेथे नैतिक-अनैतिकतेचे निकष फोल असतात. तेथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित.

भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिका-यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणांस दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे.

आज, आपल्या नजिकच्या भूतकाळाबद्दल नाहक शंका उपस्थित केल्या जात असताना, गेल्या पन्नास-साठ-सत्तर वर्षांत आपण काय केले असे न्यूनगंड निर्माण करणारे सवाल केले जात असताना, येता-जाता इस्रायलच्या ‘मोसाद’चे उदाहरण देत आपल्या देशाच्या तथाकथित दौर्बल्याचा प्रचार केला जात असताना, रॉचा हा पडद्याआडचा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे. एका सशक्त सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे.

Additional information

Weight 343 g
pages

293

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा | Raw Bharatiy Guptcharsansthechi Gudhgatha”