समीक्षक भालचंद्र नेमाडे | Samikshak Bhalachandra Nemade

भाषा : मराठी
लेखक : सुधीर रसाळ (Sudhir Rasal )
पृष्ठे :१२०
वजन : ग्रॅम

140.00 133.00

Quantity

Description

ज्ञानपीठ-पुरस्कारप्राप्त डॉ.भालचंद्र नेमाडे यांचा केवळ कादंबरीकारच नव्हे तर देशीयतेचा सिद्धांत मांडणारे समीक्षक या नात्याने मराठी वाङ्मयजगतात एक दबदबा आहे. मराठी लेखकांच्या साठोत्तरी पिढ्यांतील अनेक लेखकांचे ते एक श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर कितीही प्रतिकूल टीका झाली, तरी अनेक लेखकांची त्यांच्यावरची श्रद्धा अढळ राहते. साठोत्तरी मराठी वाङ्मयक्षेत्रावर असा अभूतपूर्व प्रभाव पाडणारे ते एकमेव लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या वा लिहिल्या जाणाऱ्या अनुकूल वा प्रतिकूल लेखनाला आपोआपच भावनिक रंग चढलेले दिसून येतात. डॉ. सुधीर रसाळ यांनी डॉ. भालचंद्र नेमाड्यांच्या वाङ्मयविषयक भूमिकेची तटस्थ, अवैयक्तिक आणि वस्तुनिष्ठ चिकित्सा या ग्रंथात केली आहे. मराठी वाङ्मयात समीक्षक नेमाड्यांच्या समीक्षालेखनाचे मूल्य काय आणि `एक समीक्षक’ या नात्याने मराठी समीक्षेत डॉ.नेमाड्यांचे स्थान काय, याची शास्त्रशुद्ध, तर्कबद्ध मीमांसा अन् मूल्यमापनात्मक समीक्षा म्हणजे समीक्षक भालचंद्र नेमाडे

Additional information

Pages

120

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समीक्षक भालचंद्र नेमाडे | Samikshak Bhalachandra Nemade”