श्री राजा शिवछत्रपती : भाग १ आणि २ | Shri Raja Shivchhatrapati : Bhag 1 Aani 2
भाषा : मराठी
लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे ( Gajanan Bhaskar Mehendale )
पृष्ठे : २४३२
छत्रपती शिवाजी महाराज हे आम मराठी जनतेचे आराध्यदैवत. महाराजांची जेवढी चरित्रे प्रकाशित होतील तेवढी हवीच आहेत. परंतु दुर्दैवाने अद्यापही मराठी भाषेतील शिवचरित्रांची संख्या फारच थोडी आहे. खऱ्या इतिहास-संशोधकाला साजेश्या तटस्थ वृत्तीने लिहिलेले एक नमुनेदार शिवचरित्र म्हणजेच गजानन भास्कर मेहेंदळे यांचे हे शिवचरित्र होय. लेखकाने तथाकथित ‘संशोधनात्मक स्वातंत्र्य’ न घेतल्यामुळे या शिवचरित्राला कपोलकल्पित कादंबरीचे स्वरूप न येता, हा एक विश्वसनीय ग्रंथराज झालेला आहे. तसेच, हे एका इतिहास-संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजूं शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आहे. गेली अनेक वर्ष मागणी असूनही हे चरित्र बाजारात उपलब्ध नव्हते. मेहेंदळेंनी ह्या पुस्तकात शिवपुर्वकालापासून ते अफजलखान वधापर्यंतचा इत्यंभुत इतिहास वर्णला आहे.
₹4,000.00 ₹3,500.00
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.