स्वयंपाकघरातील विज्ञान | Swayanapakgharatil Vidnyan
भाषा : मराठी
लेखिका : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi )
पृष्ठे : २९०
वजन : ३६० ग्रॅम
Description
स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा… विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात! धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते? प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते? विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात? आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील? विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल? डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत. आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक… स्वयंपाकघरातील विज्ञान!
Additional information
Weight | 360 g |
---|---|
pages | 290 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.