केस ॲटॅची केसची | Kes Aatachi Kesachi

भाषा : मराठी
लेखक : सत्यजित रे ( Satyajit re )
अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )
पृष्ठे : १२०
वजन : १५० ग्रॅम

एक धनाढ्य गृहस्थ कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या ऍटॅची केसची दुसर्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली अ‍ॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवितो. सुरुवातीला अगदीच किरकोळ वाटणार्‍या या केसचं फेलूदाच्या अत्यंत रोमांचकारी साहसात रूपांतर होतं. फेलूदा, तोपशे आणि जटायू अ‍ॅटॅची केसचा शोध घेत घेत सिमल्याला पोहोचतात. तेथे अनपेक्षित वळणे मिळून त्यांचा प्रवास खडतर बनतो. सिमल्याच्या बर्फाळ उतारावर या कथेचा श्वास रोखून ठेवणारा परमोत्कर्ष म्हणजे ताणलेल्या उत्कंठेची परमावधीच.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे चौथे पुस्तक.

65.00

Quantity

Description

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

Additional information

Weight 150 g
pages

120

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “केस ॲटॅची केसची | Kes Aatachi Kesachi”