मी मिठाची बाहुली | Mi Mithachi Bahuli

भाषा : मराठी
लेखिका : वंदना मिश्र ( Vandana Mishra )
पृष्ठे : १६६
वजन : ग्रॅम

175.00 167.00

Quantity

Description

मी मिठाची बाहुली गेल्या शतकातलं चवथं दशक. जेमतेम पंधरा पावसाळे पाहिलेली एक मराठी मुलगी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवते. अन् पाहता पाहता भाषेची भिंत ओलांडून मुंबईच्या गुजराथी-मारवाडी नाट्यसृष्टीत एक कुशल गायिका-अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवते. तर ही गोष्ट आहे सुशीला लोटलीकरची. म्हणजेच वंदना मिश्र यांची. आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणा-या एका साध्या, पण मानी धैर्यशील कुटुंबाची. या गोष्टीत आहे अनामिक हुरहूर लावणा-या मुंबईचा अखंड वावर एखाद्या सिंगल पर्सन कोरसप्रमाणे. माणुसकीनं भारलेली अनेक लहान-थोर माणसं या पुस्तकात भेटतील अन् वाचकांना लळा लावतील. वंदनाताईच्या लिखाणात मौखिक परंपरेतला जिव्हाळा अन् आपुलकी आहे. त्यांच्या सांगण्यातूनच त्यांचं आत्मकथन सिद्ध झालंय. हे केवळ स्मरणरंजन नाही, हे आहे एका अपूर्व काळाचं अर्थगर्भ आत्मचिंतन.

Additional information

pages

166

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी मिठाची बाहुली | Mi Mithachi Bahuli”