सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत | Saundarya Prasadhananchya Duniyet

भाषा : मराठी
लेखिका : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi )
पृष्ठे : २३६
वजन : २८७ ग्रॅम

160.00 141.00

Description

सौंदर्यप्रसाधनांच्या वापराचा मुख्य उद्देश सौंदर्याशी निगडित असला तरी व्यक्तिमत्त्व खुलवणं आणि शरीराची निगा व आरोग्य राखणं हेही त्यातून साधलं जावं, अशीही अपेक्षा असते. त्यादृष्टीने या पुस्तकाचा आवाका असा व्यापकच ठेवला आहे. ही व्याप्ती लक्षात घेता; प्रत्येकाच्या स्वभावानुसार, गरजांनुसार कमी-जास्त प्रमाणात असेल, परंतु सौंदर्यप्रसाधनं ही सर्वसाधारणपणे सर्वांच्याच दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनली आहेत. अशा या सौंदर्यप्रसाधनात कोणती द्रव्ये असतात, कोणती रसायनं असतात, ती त्वचेवर, केसांवर, डोळ्यांवर कशाप्रकारे कार्य करतात, कोणते चांगले-वाईट परिणाम करतात, त्या प्रसाधनातून नेमकं काय साधलं जातं याची शास्त्रीय माहिती या पुस्तकात दिली आहे. ही माहिती उपयुक्त तर आहेच, त्याचबरोबर रंजकही आहे. त्याचप्रमाणे कोणती प्रसाधनं वापरणं योग्य, कोणती नाही, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वानुसार त्यांची निवड कशी करावी, किती प्रमाणात त्यांचा वापर करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी लेखिकेने उपयुक्त टीपाही दिल्या आहेत. दैनंदिन विज्ञानावर सातत्याने लिखाण करणार्‍या अभ्यासू लेखिका डॉ. वर्षा जोशी यांच्या ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत…’ या पुस्तकामुळे सर्व स्त्री-पुरुषांना सौंदर्यप्रसाधनामधील विज्ञान समजून घेऊन, वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून त्यांचा डोळसपणे वापर करता येईल.

Additional information

Weight 287 g
pages

236

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत | Saundarya Prasadhananchya Duniyet”