दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ | Diwaliche Aani Sanasudiche Padarth

भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) 
पृष्ठे :  ८८
वजन :  १०० ग्रॅम

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्‍या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत. यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्‍या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे. करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.

50.00

Quantity
Browse Wishlist

Additional information

Weight 100 g
pages

88