लोकमान्य ते महात्मा ( खंड पहिला ) | Lokmanya Te Mahatma ( Khand Pahila )

भाषा : मराठी
लेखक : डॉ. सदानंद मोरे ( Dr. Sadanand More )
पृष्ठे :
वजन :  ग्रॅम

750.00 713.00

Quantity

Description

मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण
दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून
सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील
निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण
कामगिरी पार पाडली आहे.
– प्रा. जे. व्ही. नाईक

‘लोकमान्य ते महात्मा’ हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष
सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट
लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान
वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे.
– रा. ग. जाधव

महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण
मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या
आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला
आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार
ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली,
असा निष्कर्ष काढला आहे.
– सदा डुम्बरे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकमान्य ते महात्मा ( खंड पहिला ) | Lokmanya Te Mahatma ( Khand Pahila )”